हळशी

प्रकार : प्राचीन विष्णुमंदीर (वराहमंदीर)

जिल्हा : बेळगाव

नाशिक जिल्ह्य़ातील बागांचा आणि जागोजागी असलेल्या लानींचा प्रदेश म्हणजे बागलाण. याच बागलाण तालुक्यात देवळाणे हे गाव सटाण्यापासून १६ कि.मी. अंतरावर वसले आहे. खानदेशच्या या गावात बाराव्या शतकातले एक सुंदर मंदिर आहे. इ.स. ७८५ ते ८१० या काळात देवळाणे येथे कामदेव जोगेश्वराचे मंदिर बांधले गेले. खजुराहोच्या मैथुनशिल्पांप्रमाणेच इथे मैथुनशिल्पे आहेत. हेमाडपंथी बांधणीचे हे पुर्वाभिमुख मंदिर शंकराचे असुन या मंदिराला जोगेश्वर कामदेव मंदिर म्हणून ओळखले जाते. दोधेश्वरहून येणारी दोध्याड नदी व ओढा या जलप्रवाहांच्या संगमावर हे देखणे शिल्पमंदिर साकारले आहे. प्रथमदर्शनी मंडपावरील शिखराला केलेला सिमेंटचा गिलावा मात्र खटकतो. या देखण्या शिल्पमंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ सभामंडप आणि मुखमंडप अशा स्वरूपाची आहे. चांदणीच्या आकाराच्या अष्टकोनी दगडी चौथऱ्यावर मंदिराची सुरेख उभारणी केली आहे. ... मुखमंडपापुढील मूळच्या विशाल नंदीचे शीर तुटलेले असुन त्याच्या घाटदार शरीरावर सुंदर अलंकार व वस्त्रे कोरलेली आहेत. मुखमंडप नक्षीदार अशा चार शिल्पजडित स्तंभांवर तोललेला आहे. स्तंभांची एकावर एक अशा दोन स्तरांत रचना असून दोहोंमध्ये शिल्पाशिलांची वेगळी जोड दिलेली आहे. या छोटेखानी मुखमंडपात बसण्यासाठी समोरासमोर दोन आडव्या शिळा बसवलेल्या आहेत. वर्तुळाकार घुमटाकृती छताच्या मधोमध बासरीवादनात दंग झालेल्या कृष्णाची मुर्ती कोरलेली असुन शेजारी आठ गोपिका फेर धरून वादये वाजवताना दाखवलेल्या आहेत. मुखमंडपाच्या पुढचा सभामंडप बारा अर्धस्तंभांनी तोलुन धरलेला असुन सभामंडपाच्या खांबावर नाजुक नक्षीकाम केलेले आहे. धार्मिक विधी करण्यासाठी या मंडपाची रचना केलेली असावी. डाव्या व उजव्या हाताला छोटे दालन असुन डाव्या कक्षात महिषासुर मर्दिनीचे शिल्प आहे तर उजव्या कक्षात गणपती व रिध्दी-सिध्दी मूर्ती आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी मोठय़ा वर्तुळात कासवाचे शिल्प कोरलेले असुन छताकडे मोठय़ा संख्येने शिल्पाकृती कोरल्या आहेत. सभामंडपातील छतावर मध्यभागी कमळशिल्प आहे. छत आपल्या पाठीवर तोलून धरणारे यक्ष प्रत्येक स्तंभाच्या टोकाला कोरलेले आहेत. त्यांना प्रत्येकी चार हात दाखवलेले असुन ते दोन हातांनी छताला आधार देत आहेत तर उरलेल्या दोन हातांनी वाद्य वाजवीत आहेत. त्यातील काहीजण शंखनाद करीत आहेत. छताकडील काही भागात युद्धाचे प्रसंग कोरलेले असुन उंटावरून लढणारे योद्धे तसेच त्यांच्या मागेपुढे हत्ती व घोडय़ावरून आवेशात लढणारे स्वारही तेथे दाखवले आहेत. काही ठिकाणी आवेशपूर्ण भावात कुस्ती खेळणाऱ्या मल्लांची जोडी आहे तर कुठे नागबंध, पानेफुले व काही भौमितिक रचना आहेत. प्रत्येक कक्षाच्या टोकाला विविध प्रकारची कीर्तिमुखे साकारली आहेत. छताच्या दक्षिणेकडे गरुडारूढ विष्णु व त्याभोवती सर्पाची गोलाकार जाळी आहे. अर्धस्तंभावरील हंस, मिथुन, माळा व इतर कलाकुसरही बारकाईने पाहण्यासारखी आहे. मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशव्दाराजवळील लहान गाभाऱ्याच्या तोरणभिंतीवर पंचमातृकांची शिल्पपट्टी कोरलेली आहे. या पंचमातृका राजहंस, ऐरावत, वृषभ, वराह,मनुष्य यावर बसलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या मुख्यप्रवेशव्दाराजवळ वरच्या भागात शंख व चिपळया वाजविताना व नृत्य करीत असलेले स्त्री-पुरुषांचे शिल्प तसेच वेगवेगळया पध्दतीने गुंतागुंतीचे नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात प्रवेश करताना दगडी उंबरठय़ावर सुरेख चंद्रशिळा आहे. सभामंडपातून गर्भगृहात जाताना चार-पाच पायऱ्या उतरून जावे लागते. आत मधोमध उत्तराभिमुख पंचमुखी शिवलिंग आहे. हे गर्भगृह चौरसाकृती असुन गाभाऱ्याच्या उत्तर दिशेच्या उपगाभाऱ्यात शिवशंकर भगवान पार्वतीमातेला मांडीवर घेऊन बसलेले अतिशय सुंदर शिल्प आहे. पाठीमागे पुर्वाभिमुख मुख्य कोनाड्यात आदिशक्ती पार्वतीची चार भुजा असलेली मीटरभर उंचीची मुर्ती असुन तिचे चारही हात कोपरापासून खंडित झालेले आहेत. छताच्या मध्यभागी उमलत्या कमळपुष्पाचे शिल्प आहे. मुख्य गाभाऱ्याच्या आत वरील टोकाच्या भागात शिवशंकर, पंचमुखी नाग, नागरदेवतेचे प्राचीन शिल्प आहेत. पूजा साहित्य ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या भिंतीत लांबरुंद कोनाडे ठेवलेले आहेत. मंदिराला चांदणीच्या आकाराचा अष्टकोनी चौथरा ठेवल्यामुळे इथली प्रदक्षिणा अधिक अलंकारिक व मनोरंजक झालेली आहे. विविध प्रकारची छोटीमोठी शिल्पे या मार्गावर मंदिराच्या बाहेरील अंगाने कोरलेली आहेत. देवळाणे शिल्पमंदिराचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मंदिराच्या दक्षिण व उत्तरेकडील बाह्य़ांगावर खजुराहोसारखी कामक्रीडा करत असलेली विविध आसन पध्दतीचे शृंगारशिल्पे कोरलेली आहेत. छोटय़ा आकारातील ही शिल्पे लांबलांब शिलांवर पत्रिकेच्या स्वरूपात आधी कोरून मग ती जडवलेली आहेत. त्यातील नागमिथुन शिल्प हे सर्वात वैशिष्टय़पूर्ण म्हणता येईल. ही दोन्ही शिल्पे प्रथमदर्शनी श्रीगणेश असल्याचा भास होतो. व्यवस्थित निरीक्षण केल्यावर दिसतं की एका नागाला दोन नागिणींनी विळखा घातलेला आहे. मिथुनशिल्पातील सौंदर्य सौष्ठव उच्च प्रतीचे आहे. गर्भगृहातील शिवपिंडीवर पडणारे अभिषेकाचे जल बाहेर वाहून जाण्यासाठी या मार्गावर दोन उत्कृष्ट मकरशिल्पे साकारली आहेत. त्यांच्या मुखातून ते पाणी बाहेर पडते. अशी मोठय़ा आकाराची व सफाईदार मकरशिल्पे क्वचितच आढळतात. त्या मकरांचा भेदक जबडा, अणकुचीदार दंतपंक्ती व त्यातून बाहेर आलेली जीभ शरीराची चपळता त्याच्या अंगप्रत्यंगातून प्रकट होताना दिसते व हे शिल्प अगदी जिवंत असल्याचा भास होतो. येथे पूर्वी कळस कसा असावा याविषयी अनेक तर्क आहेत मात्र तज्ज्ञांच्या मते येथील कळस झोडगे येथील मंदिराच्या कळसासारखाच असावा. मंदिराचा पाषाण जवळच असलेल्या धुंधे या ठिकाणाच्या पाषाणाशी मिळताजुळता आहे. देवळाणे येथील ब्रिटिश गॅजेटनुसार ९ व्या शतकतील यादववंशीय राजा रामदेवराय यांचा वजीर हेमाद्री याने जोगेश्वर शिवमंदिर या हेमाडपंथी मंदिरांचे बांधकाम केले. या मंदिराच्या परिसरात चांदीची नाणी ब्रिटिश काळत संशोधकांना सापडली. या नाण्यांच्या पुराव्यानुसार ही नाणी कलचुरी घराण्यातील इ.स. ४२५ ते इ.स.४३० काळातील कृष्णराज राजाची आहेत. हि नाणी गुप्त काळातील नाण्यांशी मिळतीजुळती आहेत. यानुसार असा अंदाज काढता येतो की पूर्वी या परीसरात कलचूरी घराण्यांतील राजवट असावी. मंदिर डोळसपणे पहायला हाताशी कमीतकमी दोन तासाचा अवधी असायला हवा.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!