शिवडी

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : मुंबई

उंची : 0

श्रेणी : सोपी

मुंबई बेटावर एकूण ११ किल्ले बांधण्यात आले बांद्रा, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज व बॉम्बे फोर्ट ह्यापैकी बॉम्बे फोर्ट, माझगाव व डोंगरी हे किल्ले आज अस्तित्वात नाहीत. हार्बर रेल्वेमार्गावरील शिवडी स्थानकाच्या पश्चिमेस हा किल्ला आहे. शिवडी स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वरुन बाहेर पडून ‘‘कोलगेट पामोलिव्ह‘‘ कंपनीकडे जाणारा सरळ रस्ता पकडावा. ह्या रस्त्याने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण शिवडी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. मुंबई शहरात चांगल्या अवस्थेत असलेल्या ह्या किल्ल्याचे जतन पुरातत्व खात्याने केले आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी गर्द झाडीतून जाणारा पायर्यांतचा मार्ग आहे. ह्या मार्गाने आपण सैय्यद जलाल शहा यांच्या दर्ग्याजवळ येतो. शिवडीचा किल्ला बहादूर खानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला.किल्ल्याच्या काटकोनात वळणार्याय प्रवेशद्वाराने आत गेल्यावर अर्धवर्तुळाकार छताच्या दोन लांबलचक इमारती दिसतात. ... ह्याच इमारतींचा वापर तुरुंग व त्यानंतर गोदाम म्हणून केला गेला.किल्ल्याच्या चारीबाजूंना असणारी तटबंदी अजून शाबूत आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिकोणाकृती बुरुज येथे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या तटात बांधलेल्या प्रशस्त जिन्याने तटावर जाता येते. सात बेटांचा समुह असलेल्या मुंबई बेटांवर पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. मुंबई बेटांचा प्रथम लिखित उल्लेख इजिप्शियन भूगोलतज्ञ टॉलमी याने इ.स. १५० मध्ये केला. सातवाहनांच्या काळात मुंबई बेटांवरुन परदेशांशी व्यापार चालत असे. इ.स. ५ व्या व ६ व्या शतकात या भागावर मौर्य कुळाचे राज्य होते व त्यांची राजधानी होती ‘पुरी‘ म्हणजेच आजचे घारापुरी बेट. मौर्यांनंतर चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव ह्या राजघराण्यांनी मुंबईवर राज्य केले. इ.स.११४० मध्ये गुजरातच्या प्रतापबिंबाने शिलाहारांचा पराभव करुन महिकावती उर्फ माहीम येथे आपली राजधानी वसवली. इ.स. १३२० मध्ये गुजरातचा सुलतान मुबारक शहाने मुंबई जिंकली. पोर्तुगिज व गुजरातचा शेवटचा सुलतान बहादूरशहा यांच्यात १५३४मध्ये झालेल्या तहात मुंबई साष्टी व वसई बेटांचा ताबा पोर्तुगिजांकडे आला. १५३४ च्या तहात पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर ह्या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६६२ साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगिज राजकन्या ब्रगांझा हिच्याशी झाले, त्यात ‘‘मुंबई बेट’’ आंदण म्हणून इंग्रजांना मिळाली. १६६५ साली मुंबई बेट ताब्यात मिळाल्यानंतरही शिवडीचा किल्ला बांधायला १६८० साल उजाडावे लागले. १६७२ साली जंजिर्यातच्या सिध्दीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नविन किल्ले बांधले व जुने किल्ले मजबूत केले. मुंबई बेटांच्या पूर्व किनार्यां चे रक्षण करण्यासाठी सेंटजॉर्ज, डोंगरी, माझगाव, शिवडी हे किल्ले बांधण्यात आले. परळ बेटाच्या पूर्व किनार्यासवरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे मजबुतीकरण इंग्रजांनी १६८० मध्ये पूर्ण केले. इ.स. १६८९ मध्ये जंजिऱ्याच्या सिद्दी याकूत खानाने मुंबईवर केलेल्या हल्ल्यात शिवडी ,माझगाव ,माहीम हे किल्ले जिंकले त्यावेळी शिवडी किल्ल्यावर १ सुभेदार, ५० शिपाई व दहा तोफा असल्याची नोंद आढळते. नंतर औरंगजेबाच्या मध्यस्तीने ते पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतरची मजबुती १७६८ मध्ये करण्यात आली कारण १७३९ मध्ये मराठयांनी साष्टीतून पोर्तुगीजांचे उच्चाटन केले होते व मराठयांची हद्द इंग्रजांच्या हद्दीला लागली होती. इंग्रजांनी येथील राजसत्तांचा पाडाव केल्यावर १७८९ पासुन ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे तुरुंग म्हणून केला व नंतरच्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे गोदाम म्हणुन याचा उपयोग केला गेला. पनवेल, उरण, ठाणे, घारापुरीचा डोंगर ह्या परिसरात होणार्याा व्यापारावर, जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. किल्ल्याची समुद्राकडील बाजु म्हणजे किल्ल्याची शिवडीची दलदल. हे फ्लेमिंगो पक्षांचे आवडते ठिकाण असून दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान ‘‘फ्लेमिंगो‘‘ हजारोंच्या संख्येने इथे येतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!