मौनीबाबा पाटगाव

प्रकार : मध्ययुगीन मंदीर

जिल्हा : कोल्हापुर

कोल्हापुर जिल्ह्यामधील भुदरगड तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे पाटगाव. संत मौनी महाराजांच्या समाधीचे ठिकाण. समर्थ रामदासस्वामीं प्रमाणे मौनी बाबा यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरुस्थानी मानले होते. समर्थ रामदास स्वामींनी समर्थ प्रतापामध्ये " सात शत वर्षाचा पाटगावी मौनी " असे मौनीबाबांचे वर्णन केलेले आहे. शिवदिग्विजय या बखरीत मौनी महाराजांचा उल्लेख आढळतो. इतिहाससंशोधक कै. सरदेसाई, शेजवलकर इ. तज्ञांनी मौनी महाराज व शिवाजी यांच्या गुरुशिष्यसंबंधाला दुजोरा दिला आहे. उत्तूर (ता.आजरा,जि.कोल्हापूर) या गावाहून रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव या गावात वास्तव्यास आल्यावर त्यांनी मौन धारण केले त्यामुळे त्यांना मौनीबाबा वा मौनीबुवा हे नाव मिळाले. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळत नाही. त्यांचा जीवनक्रम नाथपंथांतील अवधूत या उपपंथाशी मिळता-जुळता असुन गोसाव्यांच्या ‘गिरी’ पंथाशी त्यांचा संबंध असण्याचाही शक्यता आहे. ते कथाकीर्तनाच्या माध्यमांतून सर्वसामान्य लोकांना उपदेश करीत. ... छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेवर जाण्याआधी १६७६ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट घेतली होती. सध्या पाटगाव मठामध्ये असणाऱ्या समाधीमंदीराचा गाभारा मौनीबाबांच्या जिवित काळात स्वतः छत्रपती महाराजांनी बांधुन दिला व मठास दरसाल एक हजार माणसांना पुरेल एवढा शिधा देण्याची व्यवस्था केली. पुढे संभाजी महाराजांच्या काळात तुरुतगिरी हे (१७२८ पर्यंत) पीठपती झाले. तुरुतगिरींनी मौनींच्या समाधीपुढील सभामंडप, नगारखाना या इमारती बांधल्या. तसेच मठातील पुराणिक, हरदास इत्यादींसाठी दरसाल अठरा होनांची तरतूदही केली होती यासंबंधीच्या सनदा उपलब्ध आहेत. छत्रपती राजाराम आणि ताराबाई यांनीही मौनी बाबांच्या मठाचा यथायोग्य परामर्श घेतला. करवीर गादीवरील सर्वच छत्रपती या पीठाला फार मान देत. कोल्हापुरहुन रांगणा किल्ल्यावर जाताना पाटतगावचा मठ वाटेवरच असल्याने बहुतांशी दुर्गप्रेमी या स्थानास भेट देऊन नंतरच पुढे जातात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!