भोरगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ३४८० फुट
श्रेणी : अत्यंत कठीण
सह्याद्रीच्या गिरीशिखरांवर वसलेले अनेक गडकिल्ले आज केवळ नावापुरते शिल्लक राहीले आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील भोरगड हा लष्कराच्या ताब्यात असलेला असाच एक किल्ला. हा किल्ला लष्कराच्या ताब्यात असून किल्ल्यावर सुरक्षादलाची रडार यंत्रणा असल्याने सुरक्षा दृष्टीकोनातुन किल्ल्यावर जायला पूर्णपणे बंदी आहे पण किल्ला म्हणुन या डोंगराची नोंद घेणे आवश्यक असल्याने या किल्ल्याची नोंद घेतली आहे. गडाच्या माथ्यावर रडार यंत्रणा बसविताना पुर्णपणे सपाटी केल्याने किल्ल्याचे अवशेष पुर्णपणे नष्ट झाले असुन केवळ किल्ल्याचा डोंगर शिल्लक राहिला आहे. नाशिकहून भोरगड किल्ल्याचा डोंगर केवळ १५ कि.मी.अंतरावर असून रामशेज किल्ला पाहुन आशेवाडीतून रासेवाडी किंवा देहेरगडकडे जाताना या किल्ल्याचा डोंगर पहायला मिळतो. साधारण त्रिकोणी आकाराचा हा किल्ला पुर्वपश्चिम पसरलेला असून माथ्यावरील अवशेष रडार उभारताना पुर्णपणे भुईसपाट करण्यात आले आहेत.
...
याशिवाय देहेरगडावर गेल्यास भोरगड किल्ला काही प्रमाणात जवळुन पहायला मिळतो. आज भोरगड केवळ नावापुरता गड म्हणुन अस्तित्वात आहे.
© Suresh Nimbalkar