परतुर

प्रकार : नगरदुर्ग

जिल्हा : जालना

उंची : 0

श्रेणी : सोपी

मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात एखाद दुसरा भुईकोट व अपवादात्मक गिरीदुर्ग वगळता फार कमी प्रमाणात दुर्ग पहायला मिळतात. मराठवाडा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. परतूर हा जालना जिल्ह्यातील एक तालुका. या तालुक्याच्या ठिकाणी गढी असल्याचे काही जुन्या कागदपत्रात वाचनात आले होते. मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना केवळ या वाचलेल्या माहितीवर परतूर गढीची भटकंती करण्याचे ठरवले. परतूर हे तालुक्याचे ठिकाण असुन अनेक शहरांशी ते रस्त्याने तसेच लोहमार्गाने जोडले गेले आहे. परतूर पोलीस चौकीच्या आसपास हि गढी असल्याची माहीती मिळाली होती पण प्रत्यक्षात तिथे पोहोचल्यावर मात्र हि गढी भाजी बाजाराजवळ असल्याचे कळले. उत्सुकतेने आम्ही भाजीबाजारात पोहोचलो पण जागेवर पोहोचल्यावर मात्र आमचा अपेक्षाभंग झाला. ... स्थानीक ज्या ठिकाणाला गढी म्हणुन ओळखतात त्याठिकाणी अर्धवट तुटलेल्या दरवाजाची केवळ एक बाजु शिल्लक आहे. या दरवाजाचे एकुण आकारमान पहाता हा गढीचा दरवाजा नसुन नगरदुर्गाचा दरवाजा आहे. या दरवाजाचा कमानी पर्यंतचा भाग घडीव दगडात बांधलेला असुन वरील भाग विटांनी बांधलेला आहे. दरवाजाच्या दर्शनी भागात शरभ कोरलेला असुन त्यामागे मानवाकृती कोरलेली आहे. दरवाजाच्या आतील भागात पहारेकऱ्याची देवडी आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गढीचा हा एकमेव अवशेष असुन रस्ता रुंदीकरणात तो देखील पाडला गेला. गढीची फेरी जेथून सुरु होते तेथच संपते. हा अर्धवट तुटलेला एकमेव दरवाजा पहाण्यासाठी ५ मिनिटे पुरेशी होतात. स्वतंत्रपुर्व काळापर्यंत हा भाग निजामाच्या ताब्यात असल्याने त्याचा इतिहासात फारसा उल्लेख येत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!