नाणे

प्रकार : नगरकोट

जिल्हा : धुळे

उंची : 0

नावापुरते उरणे म्हणजे नक्की काय याचा प्रत्यय आपल्याला जळगाव-धुळे जिल्ह्यातील गढीकोट भटकंती करताना वारंवार येतो. केवळ नावापुरता उरलेली अशीच एक गढी आपल्याला धुळे जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या नाणे गावात पहायला मिळते. नाणे हे गाव पारोळा या तालुक्याच्या ठिकाणाहुन ४३ कि.मी.अंतरावर तर धुळे शहरापासुन २८ कि.मी.अंतरावर आहे. कधीकाळी नगरदुर्गाच्या आत असलेली हि गढी काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झाली असुन त्या जागी नव्याने घरे उभारलेली आहेत. हि घरे असलेली जागाच आता गढी म्हणुन ओळखली जाते पण त्या ठिकाणी गढीचे नामोनिशान नाही. कधीकाळी गावाभोवती असलेल्या कोटाची देखील वाताहात झालेली असुन त्यातील फारच थोडा भाग आता शिल्लक उरला आहे. गावात प्रवेश करताना नव्याने बांधलेल्या दरवाजा शेजारी मूळ दरवाजा शेजारी असलेले दोन बुरुज अवशेष स्वरूपात पहायला मिळतात. ... या बुरुजांचा केवळ तळातील भाग आज शिल्लक आहे. गढीचे वा नगरकोटचे इतर कोणतेही अवशेष शिल्लक नसल्याने १० मिनिटात आपले दुर्गदर्शन पूर्ण होते. गढी हे ठिकाण वगळता स्थानिकांना इतर कोणतीही माहिती नसल्याने गढीचा इतिहास पुर्णपणे अबोल आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!