नांदगाव

प्रकार : भुईकोट

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : 0

श्रेणी : सोपी

कोकणातील काही किल्ले आज काळाच्या उदरात गडप झाले असुन आज त्याचे अस्तीत्व केवळ इतिहासाच्या पानातच उरले आहे. देवगड तालुक्यात असलेला नांदगावचा किल्ला याचेच एक उदाहरण आहे. इतिहासाच्या पानात हा किल्ला आज केवळ नावापुरता उरला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून देवगड येथे जाण्यासाठी नांदगाव येथुन फाटा फुटतो. नांदगाव जरी अस्तित्वात असले तरी येथील कोट किंवा त्याचे अवशेष मात्र आज कोठेही दिसुन येत नाही. इतकेच नव्हे तर तर येथील वयोवृध्द लोकांनाही येथे किल्ला होता हे माहित नाही. नांदगाव किल्ल्याचा उल्लेख मला आढळला तो सतीश अक्कलकोट यांच्या गडकिल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पुस्तकात. त्यांनी या पुस्तकात केलेल्या इतिहासातील नोंदीनुसार एका तारीख नसलेल्या नक्कल पत्रात या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. त्यांच्या नोंदीनुसार कोल्हापुर महाराजांच्या पदरी शिपाई म्हणुन असलेल्या खंडोजी नाईक जगताप यांचा मुलगा शेखोजी स्वपराक्रमाने सरदार झाला व त्याची नेमणुक भुदरगड भागात झाली. ... त्याने राजापुर भागात धुमाकुळ घालुन बायका पळवुन नेणाऱ्या हबशी लोकांचा पुरेपूर बंदोबस्त केल्याने महाराजांनी त्याला कोकणात नांदगाव मुक्कामी कोट बांधुन ठेवले. हा शेखोजी पुढे भुदरगडावरील स्वारीत मारला गेला. या नोंदीव्यतिरिक्त इतर कोठेही या किल्ल्याचा उल्लेख आढळत नाही. कोल्हापुरहुन बावडा घाटमार्गे कोकणातील विजयदुर्ग देवगड बंदराकडे जाणाऱ्या मार्गावर नांदगाव हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने महत्वाचे ठिकाण आहे. पण या किल्ल्याचा इतरत्र कोठेही उल्लेख मिळत नसल्याने व मिळालेले पत्र हे मुळ पत्र नसुन तारीख नसलेली नक्कल असल्याने काही प्रमाणात संशयास जागा आहे. कोट असल्याचे कोणतेच लक्षण गावात व आसपास दिसत नसल्याने येथे किल्ला होता असे ठोस विधान सध्या तरी करता येत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!