नसीराबाद
प्रकार : गढी
जिल्हा : जळगाव
उंची : 0
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रातील काही भुईकोट वाढत्या लोकवस्तीने काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झाले असले तरी काही भुईकोट मात्र आजही आपला किल्लेपणाचा एखाद दुसरा अवशेष उराशी कवटाळून बसले आहेत. असाच एक ढासळलेला एकमेव बुरुज सांभाळत आपले अस्तित्व सांगणारा भुईकोट म्हणजे नसीराबाद. जळगाव शहरापासुन केवळ १० कि.मी.अंतरावर नसीराबाद शहर आहे. या गावात कधीकाळी गढी अथवा कोट असलेला नसीराबाद भुईकोट आज पुर्णपणे नष्ट झाला असुन गावातील दूरसंचार केंद्रासमोर त्याचा एकमेव बुरुज शिल्लक आहे. विटांमध्ये बांधलेला हा बुरुज मध्ययुगीन बांधकामाची साक्ष देतो. हा बुरुज आज पुर्णपणे कोसळलेला असुन काही काळाचा सोबती आहे. कोटाचे इतर कोणतेही अवशेष शिल्लक नसल्याने काहीही अंदाज करता येत नाही. कोटाचा हा बुरुज पहाण्यास ५ मिनिटे पुरेशी होतात.
...
याशिवाय गावाच्या वेशीवर असलेला नव्याने बांधलेला कुंभार दरवाजा पहायला मिळतो. कोटाबाबत इतर काहीही माहिती मिळत नाही. छत्रपती शाहू महाराजांकडून दुर्गोजीराव भोईटे यांना जळगाव, नशीराबाद व जवळील प्रांत जहागीर म्हणुन मिळाला होता. जळगाव शहराची स्थापना मराठा सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. बहुदा याच काळात नशिराबाद कोट बांधला गेला असावा. भोईटे बऱ्याच काळापर्यंत या भागात राज्यकर्ते राहिले. त्यांनी जळगाव येथे बांधलेल्या वाडयाला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते.
© Suresh Nimbalkar