धामारी
प्रकार : नगरकोट
जिल्हा : पुणे
उंची : 0
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रातील गडकोटांची भटकंती करताना आपल्याला अनेक नगरदुर्ग पहायला मिळतात. शिक्रापुर -पाबळ मार्गावर असलेला धामारी नगरदुर्ग त्यापैकी एक. धामारी गाव शिक्रापुर-पाबळ मार्गावर वसलेले असुन शिक्रापुर फाट्यापासून १२ कि.मी.अंतरावर तर पुणे शहरापासुन साधारण ४८ कि.मी.अंतरावर आहे. धामारी गावात जाण्यासाठी यस.टी. तसेच महानगर पालिकेची पुणे-पाबळ हि बससेवा उपलब्ध आहे. शिक्रापुर –पाबळ मार्गाने पाबळकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजुस या नगरदुर्गाची वेस व त्यात दोन्ही बाजुस असलेले उध्वस्त बुरुज सहजपणे नजरेस पडतात. काळाच्या ओघात या नगरदुर्गाचे इतर अवशेष पुर्णपणे नष्ट झालेलें असुन हा दरवाजा व त्याशेजारील दोन अर्धवट बुरुज शिल्लक आहे. या दरवाजाचे आता क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले आहे. दरवाजाच्या आतील बाजुस लाकडी दरवाजा अडकवण्यासाठी दगडी बिजागरे आहेत.
...
तटबंदीची बहुतांशी पडझड झाल्याने आतील बाजूने दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी नव्याने पायऱ्या बांधलेल्या आहेत. या दरवाजा समोर काही अंतरावर नव्याने बांधलेले हनुमान मंदिर आहे. नगर कोटाचे इतर कोणतेही अवशेष शिल्लक नसल्याने वेशीजवळ सुरु झालेली आपली दुर्गफेरी तेथेच संपते. दरवाजा पहाण्यासाठी पाच मिनिटे पुरेशी होतात. धामारी गाव पिंपळे येथील जगताप पाटलांना इनाम होते. बडोदेकर गायकवाडांशी तसेच कोल्हापूरकर छत्रपतींशी या घराण्याचे सोयरसंबंध आहेत. या व्यतिरिक्त या नगरकोटाचा इतर कोणताही इतिहास तुर्तास उपलब्ध नाही.
© Suresh Nimbalkar