टेम्भूर्णी-जालना

प्रकार : नगरकोट

जिल्हा : जालना

समाज माध्यमावर काही वेळा कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता माहिती प्रसारित केली जात असल्याने अनेकदा चुकीची माहिती देखील पसरली जाते. जालना जिल्ह्याची भटकंती करताना मला याचा प्रत्यय आला. समाज माध्यमावर टेम्भूर्णी गावाला नगरकोट असल्याची बातमी वाचनात आल्याने जालना जिल्ह्याची भटकंती करताना या गावात जाणे झाले. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात असलेले टेम्भूर्णी हे गाव जालना शहरापासुन ३८ कि.मी. अंतरावर तर जाफराबाद या तालुक्याच्या ठिकाणाहुन ११ कि.मी.अंतरावर आहे. गावाला नगरकोट नसुन इंग्रजांच्या काळात कार्तिक वद्य ८ शके १८५६ म्हणजे इ.स १९३४ मध्ये बांधलेले दोन वेशीवजा दरवाजे आहेत. यातील पुर्व बाजुस असलेल्या मुख्य दरवाजाच्या कमानीवर मराठी व उर्दु असे दोन शिलालेख असुन त्यात हा दरवाजा कोणत्या साली बांधला गेला याचा उल्लेख आहे. या दोन दरवाजामुळे कोणीतरी समाज माध्यमावर या गावाला कोट असल्याचे लिहिले आहे जे पुर्णपणे चुकीचे आहे. गावाला भेट दिली असता चुकीची माहिती मिळाल्याचे समोर आल्याने खरी माहिती दुर्गप्रेमीना असावी यासाठी मी या गावाचा उल्लेख आपल्या संकेतस्थळावर करत आहे. ... महाराष्ट्रात टेम्भूर्णी नावाची असंख्य गावे असुन प्रत्येक जिल्ह्यात एक दोन टेम्भूर्णी नावाची गावे सापडतील. यातील सोलापुर जिल्ह्यात असलेल्या टेम्भूर्णी गावाला नगरकोट असुन त्याची तटबंदी, दोन मुख्य व दोन लहान दरवाजे आजही शिल्लक आहेत. या कोटाची संपुर्ण माहिती आपल्या www.durgbharari.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या नामसाधर्म्यामुळे हा घोळ झाला असावा.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!