जाटनांदुर

प्रकार : गढी

जिल्हा : बीड

उंची : 0

श्रेणी : सोपी

मराठवाडा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला येथे किल्ल्यापेक्षा गढी जास्त प्रमाणात पहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात जाटनांदुर गावात आपल्याला अशीच एक अर्धवट बांधलेली गढी पहायला मिळते. बीड–जाटनांदुर हे अंतर ४५ कि.मी.असुन पाटोदा या तालुक्याच्या ठिकाणापासुन हि गढी २१ कि.मी.अंतरावर आहे. या भागात ५० कि.मी.च्या घेऱ्यात सहा-सात गढ्या असुन त्या एका दिवसात पहाता येतात पण त्यासाठी खाजगी वाहन सोबत असायला हवे. जाटनांदुर गावातील एका लहानशा टेकडीवर हि गढी बांधलेली असुन बस थांब्यापासून चालत ५ मिनीटात आपण गढीजवळ पोहोचतो. गढीच्या तटबंदीत एकुण सात बुरुज असुन यातील एक बुरुज घडीव दगडात बांधलेला आहे. ... गढीचे उर्वरीत सहा बुरुज व तटबंदी ओबडधोबड रचीव दगडांची असुन हे बांधकाम सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले आहे. गढीचा दरवाजा बांधण्याआधीच बांधकाम थांबल्याने अर्धवट बांधलेल्या तटातुन आपला गढीत प्रवेश होतो. गढीच्या माथ्यावर बांधकामासाठी आणलेल्या दगडांची रास पसरलेली आहे. या राशीवर मोठ्या प्रमाणात झाडोरा माजलेला असुन त्यातुन वाट काढताना एक अर्धवट खोदलेली विहीर दिसुन येते. गढीच्या एका बुरुजावर देवाचे ठाणे स्थापन केलेले असुन तेथे दगडांना शेंदूर फासलेला आहे. या व्यतिरिक्त माथ्यावर इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. गढीचा माथा साधारण १५ गुंठे परिसरावर पसरलेला आहे. गढीचे बांधकाम अर्धवट थांबल्याने गढीला कोणतीही संरक्षक रचना नाही. संपुर्ण गढी फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. हि गढी हैदराबाद निजामाच्या कालखंडात बांधली गेली या व्यतिरिक्त स्थानिकांना कोणतीही माहीती सांगता येत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!