केळवे कस्टम कोट-2
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : पालघर
उंची : 0
श्रेणी : सोपी
पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. केळवे शितलादेवी मंदिरा वरुन बाजाराकडून पुढे जाणाऱ्या दांडाखाडी मार्गावरच्या केळवे कस्टम कार्यालयाकडून उजव्या बाजुने कोळीवाड्यास जाणाऱ्या वाटेवर केळवे कस्टम कोट-२ आहे. या कोटाशेजारीच एक नव्याने बांधलेले चर्च आहे या चर्चमध्ये आपल्याला ३०० वर्षे जुनी लाकडाची मदर मेरीची मुर्ती पाहायला मिळते. चर्चच्या डाव्या बाजूस पोर्तुगीजकालीन वखारीचे अवशेष मोठया प्रमाणात पाहायला मिळतात. हा कोट म्हणजे वखारीच्या रक्षणाकरिता व टेहळणीकरता बांधलेला चौरस आकाराचा एकांडा बुरूज. केळवे कस्टम कोटाचे इतिहासातील नाव माहित नसल्याने, हा कोट शेजारील कस्टम कार्यालयाच्या नावाने व याच्या शेजारीच समांतर अजून एक कोट असल्याने कस्टम कोट-२ म्हणूनच ओळखला जातो.
...

© Suresh Nimbalkar