कुऱ्हे

प्रकार : भुईकोट

जिल्हा : जळगाव

उंची : 0 फुट

श्रेणी : सोपी

जळगाव जिल्ह्यातील गढीकोटांची भटकंती करताना कोणत्याही प्रकारची माहिती नसलेला एक अर्धवट बांधलेला पण भक्कम असा भुईकोट आम्हाला पहायला मिळाला. अंमळनेर शहरातुन धरणगावकडे जाताना साधारण ८ कि.मी.अंतरावर कुऱ्हे खुर्द गाव आहे. या गावाच्या ३ कि.मी अलीकडे म्हणजे अंमळनेर शहरापासुन ५ कि.मी. अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजुस आपल्याला या किल्ल्याचा प्रशस्त बुरुज व तटबंदी पहायला मिळते. शोधण्यासाठी सोपे जावे यासाठी मी त्या ठिकाणाचे अक्षांश व रेखांश येथे देत आहे. 21.037694, 75.116259 कोणीतरी या ठिकाणाचे आता गुगल नकाशावर अंमळनेर फोर्ट असे नामकरण केलेले आहे. किल्ल्याचा परिसर म्हणजे या सपाट भागातील लहानशी टेकडी असुन या टेकडीला तटाबुरुजांच्या पागोट्याने सजवायला केलेली सुरवात आहे. अर्धवट झालेले हे बांधकाम अघडीव दगडात केलेले असुन ते सांधण्यासाठी चुन्याचा वापर करण्यार आला आहे. या बांधकामात एक मोठा बुरुज व साधारण १०० फुट लांबीची तटबंदी बांधलेली असुन उर्वरीत बांधकाम अर्धवट राहिल्याचे दिसुन येते. ... किल्ल्याच्या दरवाजाच्या बांधकामाची सुरवात न झाल्याने तो नेमका कुठे असावा ते कळत नाही. किल्ल्याची बांधीव तटबंदी केवळ पुर्व भागात असल्याने उर्वरीत भाग हा केवळ टेकडीचा आहे. या टेकडीवर कोठेही पाण्याचे टाके दिसुन येत नाही. बुरुजाला लागुनच मांगीरबाबांचे स्थान आहे. कोटाचे फारसे अवशेष नसल्याने १०-१५ मिनिटात आपले दुर्गदर्शन पुर्ण होते व आपण पुढील किल्ल्याच्या मार्गाला लागतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!