कर्नाळा

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : १३०० फुट

श्रेणी : मध्यम

मुंबईहुन कोकणात अथवा पुण्याकडे जाताना पनवेल शहर ओलांडल्यावर अंगठ्याच्या आकाराचा कर्नाळा किल्ला बहुतांशी लोकांना चांगलाच परिचयाचा आहे. रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावाजवळ असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला शिरढोण गावापुढे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पक्षी अभयारण्य गाठावे लागते. किल्ल्याच्या पायथ्यााशी असलेले घनदाट जंगल संरक्षित अभयारण्य असुन या जंगलात दीडशेहून अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात. किल्ला वनखात्याच्या ताब्यात असल्याने किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवेशशुल्क आकारले जाते. किल्ल्यावर जाणारी वाट चांगलीच मळलेली असुन उभी चढण असल्याने थकवणारी आहे. आपण किल्ल्यावर चढतो तो डोंगर व कर्नाळा किल्ल्याचा डोंगर एका लहान डोंगरसोंडेने एकमेकाशी जोडले गेले आहेत. या वाटेने तासाभरात आपण किल्याखाली असलेल्या पठारावर येतो. ... किल्ल्याचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले असुन बालेकिल्ला म्हणजे १०० फुट उंचीचा सुळका आहे. किल्ल्याच्या दरवाजाखाली असलेल्या पठारावर कर्णाई देवीचे घुमटीवजा मंदिर असुन त्यात काळ्या पाषाणात घडवलेली देवीची मूर्ती आहे. मंदिराबाहेर काही कोरीव शिल्प ठेवलेली आहेत. पठारावरून ढासळलेला पहिला दरवाजा पार करून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. किल्ल्याच्या पुढील भागात वर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या असून या पायऱ्यावर संरक्षणासाठी लोखंडी कठडे बांधले आहेत. वाटेच्या पुढील भागात असलेली लोखंडी शिडी चढुन आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजात पोहोचतो. या दुसऱ्या दरवाजापुढे काही अंतरावर किल्ल्याचा तिसरा दरवाजा असुन या दरवाजाने आत शिरल्यावर आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो. गडाचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असुन त्यावरील तटबंदी मोठया प्रमाणात ढासळलेली आहे. दरवाजासमोर भवानी मातेचे मंदिर असुन त्याशेजारी एक चिरेबंदी वास्तु तिच्या भिंतीसकट आजही उभी आहे. वाड्यासमोर काही अंतरावर एक शिवलिंग उघडयावर ठेवलेले आहे. समोर साधारण १०० उंचीचा सुळका असुन या सुळक्या वर मोठया प्रमाणात मधमाशांची पोळी नजरेस पडतात. हा सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे साहित्य व तंत्र अवगत असणे गरजेचे आहे. या सुळक्याच्या पायथ्याशी कातळात मोठया प्रमाणात पाण्याच्या टाक्या व गुहा कोरलेल्या आहेत. सुळक्याच्या आसपास मोठया प्रमाणात किल्ल्याची तटबंदी दिसुन येते. या सुळक्याला वळसा घालुन मागे गेल्यावर दुसरा लहान डोंगर एका लहानशा डोंगरसोंडेने किल्ल्याच्या डोंगरास जोडलेला पहायला मिळतो. गडाच्या या पश्चिम भागात काही प्रमाणात सपाटी असुन त्यावरील बांधकाम ब-यापैकी शिल्लक आहे. या भागात दोन दरवाजे असुन त्यातील एका दरवाजाबाहेर दोन्ही बाजूस शरभ कोरलेले आहेत. किल्ल्या ची एकुण रचना व त्याचे भौगोलिक स्थान पहाता याचा वापर प्रामुख्यादने सभोवतालच्याच प्रदेशावर टेहळणी करण्याोसाठी येत असावा. किल्याता वर फारसी भाषेतील एक व मराठी भाषेतील एक असे दोन शिलालेख आढळतात. यातील फारसी शिलालेखात 'सय्यद नुरुद्दीन मुहम्मसद खान, हिजरी ११४६ (इ.स. १७३५) असे लिहिले आहे. तर मराठी शिलालेखावर 'शके १५९२ संवत्सनर आषाढ शुद्ध १४ मालुजी गंभीरराव ठाणदार कर्नाळा घेतला' असे वाक्यन कोरलेले आहे. किल्या ् च्याव माथ्याावरून पनवेल शहर तसेच पश्चिमेकडे माणिकगड व त्याषमागे पसरलेली सह्याद्रीची रांग तर उत्तारेकडे सांकशीचा किल्ला तर वायव्येाकडे माथेरान पाहता येते. गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. किल्ल्यावर असणाऱ्या पाण्यायच्याक टाक्या पहाता कर्नाळा किल्ला प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात असावा. मध्ययुगीन काळात पनवेल येथुन बोर घाटातून मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या व्यापारी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत असे. कर्नाळा किल्ल्याचे बांधकाम नेमके कोणी केले हे इतिहासाला माहित नसले तरी इ.स.१२४८ ते इ.स. १३१८ पर्यंत कर्नाळावर देवगिरी यादवांचे राज्य होते. इ.स.१३१८ ते १३४७ दरम्यान बहमणीच्या ताब्यात असलेला हा किल्ला निजामशाहीच्या अधिपत्याीखाली आला. या काळात कर्नाळा उत्तर कोंकण म्हणजेच ठाणे व रायगड ह्यांचे मुख्यालय होते. गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांच्या मदतीने निजामशहा कडून कर्नाळा किल्ल्याचा ताबा मिळवला. पण निजाम परत चालून आलेला पाहून त्याने हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात दिला. वसईच्या कॅप्टनने निजामाच्या सैन्याचा वेढा मोडून काढून स्वतःचा अंमल स्थापन केला आणि किल्ल्याच्या संरक्षणार्थ ३०० युरोपियन सैनिक तैनात केले. पुढे पोर्तुगीज व निजाम यांच्यामध्ये झालेल्या मैत्रीच्या तहात वार्षिक १७५० पौंड ह्या ठराविक खंडणीच्या रकमेवर पोर्तुगीजांनी हा किल्ला निजामशहाकडे सोपविला. निजामशाहीच्या अस्तानंतर कोकणातील हा भाग मुघलांच्या ताब्यात आला पण काही वार्षिक खंडणीच्या बदल्यात मुघलांनी हा भाग आदिलशहाला दिला. छत्रपती शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला आदिलशहाकडून स्वराज्यात सामील केला. त्यानंतर पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात आलेल्याय तेवीस किल्ल्यांमध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. मराठयांच्या सैन्याने इ.स. १६७० मध्ये गडाला वेढा घातला. मातीचे व चिखलाचे अडसर तयार करून ते पुढे सरकले व तटापर्यंत पोहोचले. तटाला लागल्यावर माळा लावून मराठा सैन्य किल्ल्यात शिरले व कर्नाळा किल्ला ताब्यात घेतला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात मोगलांनी किल्ला पुन्हा आपल्या अंमलाखाली आणला. इ.स. १७४० मध्ये किल्ला मराठयांच्या ताब्यात आल्यावर पेशव्यांनी अनंतराव फडके यांना तिथे किल्लेदार म्हणून नेमले. हे अनंतराव फडके म्हणजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा होय. इ.स. १८०३ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या वतीने गडाचा ताबा घेतला. इ.स.१८१८ मध्ये जनरल प्रॉथरने कर्नाळा ताब्याात घेतला त्यावेळी कर्नाळ्यावर असलेल्या शिबंदीने ब्रिटिशांच्या सैन्याशी तीन दिवस झुंज दिली. कर्नाळाच्या बेलाग सुळक्याने आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली. दुर्गमहर्षी गो.नी.दांडेकर यांच्या जैत रे जैत या कादंबरीला कर्नाळा किल्ल्याची पार्श्वभूमी लाभली असुन याच परिसरात ‘जैत रे जैत’ या मराठी चित्रपटाचे चित्रण झालेले आहे. मुंबई-पुणे-ठाणे येथुन कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून परत जाता येते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!