घृष्णेश्वर

प्रकार : प्राचीन शिवमंदीर/ज्योतिर्लिंग

जिल्हा : औरंगाबाद

औरंगाबादच्या वेरुळ गुंफाजवळ असणाऱ्या घृष्णेश्वर शिवलिंगाची कथा मोठी रोचक आहे. भगवान शंकरांनी चमत्काराने एका मातेला तिचा मृत पुत्र पुन्हा जिवंत करून देऊन शिवशंकर लिंगरूपाने याच ठिकाणी राहील्याचे म्हटले जाते. औरंगाबाद जिल्ह्यात हे मंदिर असून औरंगाबाद पासून ४५ किमी.तर दौलताबाद स्टेशनापासून १५ किमी.वर आहे. घृष्णेश्वर देवालय हे भारतातील ज्योतिर्लिंग स्थानापैकी १२वे व शेवटचे स्थान असुन ते स्वयंभू मानले जाते. हे मंदिर एलगंगा नदीच्या तीरावर वसलेले असुन मंदिराशेजारी शिवकुंड नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून या स्थानाला घृणेश्वर म्हणतात. स्कन्द्पुराण,शिवपुराण,रामायण व महाभारतात श्रीघृष्णेश्वराचा उल्लेख आला आहे. सुमारे १५०० वर्षापुर्वी राष्ट्रकुट घराण्यातील राजा कृष्णराजने हे मंदिर बांधले आहे. छोटयाशा दरवाजातून प्रवेश केल्यावर आपण मंदीराच्या प्रांगणात पोहोचतो. ... मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस आहे. हे मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना असुन याचे शिल्पवैभव कैलासा इतकेच अनुपम आहे. स्तंभावरील कोरीव काम अपुर्व आहे. दगडी चौथऱ्यावर उभारलेले हे मंदीर अर्धे लाल पाषाणाचे असुन उर्वरीत भागाला चुन्याचा गिलावा केला आहे. मंदिराच्या या लाल पाषाणामुळे काही ठिकाणी या मंदिराचा उल्लेख कुंकुमेश्वर असा येतो. मंदिरात नंदीची सुंदरमूर्ती असून खांबावर रामायण व महाभारत दशावताराचे चिञ रेखाटले आहे. गाभाऱ्यात शिवलिंग असुन पिंडीसमोर पार्वतीची संगमरवरी दगडातील मूर्ती आहे. शिवाजीराजाचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा सर्वप्रथम जीर्णोद्धार केला त्या संबंधीचा एक शिलालेख येथे आहे. इ.स.१७३० मध्ये गौतमीबाई महादेव होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला तर इ.स. १७९१ मध्ये अहिल्याबाई होळकरांनी एक एकर बागेत शिवालय तिर्थ बांधले. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!