मणेरी

प्रकार : भुईकोट

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : 0

श्रेणी : सोपी

कोकणातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट झाले असुन काही किल्ल्यांचे अवशेष नावापुरते नाहीतर इतिहासाच्या पानातच उरले आहे. मणेरी किल्ला याचे एक उदाहरण आहे. दोडामार्ग तालुक्यात असलेला मणेरी किल्ला आज केवळ काही ओझरत्या अवशेष रुपात शिल्लक आहे. मणेरी किल्ला दोडामार्ग या तालुक्याच्या ठिकाणापासुन ३ कि.मी. अंतरावर तर बांदयापासून २१ कि.मी. अंतरावर मणेरी नदीच्या काठावर आहे. मणेरी किल्ल्याबद्दल परीसरातील लोकांना काहीही माहित नाही पण गावातील लोकांना मात्र या ठिकाणी असलेल्या देवचाराच्या घुमटीमुळे हे ठिकाण परिचित आहे. त्यामुळे गावातील लोकांकडे मणेरी किल्ल्याची चौकशी करताना देवचाराची घुमटी कोठे आहे अशी चौकशी करावी. या देवचाराच्या घुमटीत पाटावर मांडलेले शहाळे देवरूपात पूजले जाते. घुमटीच्या मागील बाजुस मणेरीचा किल्ला होता. आज या किल्ल्याचा केवळ खंदक व तटाचा पाया शिल्लक असुन इतर भागात मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने आत फिरता येत नाही. ... इ.स.१६८४ ते इ.स.१७८२ या काळात या काळात मणेरी महालाचे उल्लेख येतात. इ.स.१६८४ मध्ये मुघल शहाजादा शहाआलम याच्या गोव्यावरील स्वारीत डिचोली, बांदा, कुडाळ जाळल्याचे उल्लेख येतात पण मणेरी कोट उध्वस्त केल्याचे दिसत नाही. इ.स.१६९७ मध्ये हा प्रांत वाडीकर खेम सावंताच्या ताब्यात होता. इ.स.१७०१ मध्ये हरी गवस हा मणेरीचा देसाई होता. छत्रपती शाहु महाराजांना कोकण प्रदेश मोगलांकडून जहागीर म्हणुन मिळाल्यावर खेम सावंत ताराबाईच्या पक्षात सामील झाल्याने इ.स. १७०८ मध्ये मणेरी महाल त्यांना वतन म्हणुन मिळाला. इंग्रज व सावंतवाडीकर भोसले यांच्या भांडणात इ.स.१७८२ च्या नोव्हेंबर महिन्यात भोसल्यांनी मणेरी ठाणे ताब्यात घेतले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!