SOPARA STUP
TYPE : MONUMENTS
DISTRICT : PALGHAR
GRADE : EASY
नालासोपारा हा परिसर प्राचीन काळान शुर्पारक नगरी नावाने ओळखला जात होता. येथे असलेल्या शुर्पारक बंदरातून देशविदेशात व्यापार चालत असे. सातवाहन काळात भरभराटीस आलेल्या या शहरात बौद्ध धर्माचाही चांगलाच प्रसार झाला होता. येथे असलेल्या अनेक वास्तु काळाच्या ओघात पडद्याआड गेल्या तर काही वास्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली झाकल्या गेल्या. जमिनीत गाडला गेलेला असाच एक स्तुप १८८२ साली येथे झालेल्या उत्खननात उजेडात आला. हा स्तूप साधारण अडीच हजार वर्ष इतका जुना आहे. नालासोपाऱ्यातील या बौद्ध स्तुपाची आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बौद्ध स्तूप म्हणून गणना होते कारण भगवान बुद्धांनी या स्तुपात वास्तव्य केल्याचे मानले जाते. सध्याची या बौद्ध स्तुपाची अवस्था मात्र अतिशय दयनीय असुन विटांनी रचलेला गोलाकार घुमट इतपतच याचे अवशेष शिल्लक आहेत. या घुमटाच्या आसपास दगडात कोरलेल्या मुर्ती तसेच काही कोरीव अवशेष पहायला मिळतात.
...
प्राचीन काळान शुर्पारक नगरी येथील पूर्णा नावाचा व्यापारी उत्तर प्रदेशात गेल्यावर भगवान गौतम बुद्धांच्या प्रवचनाने प्रभावित झाला आणि त्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. शुर्पारक नगरीत परतल्यावर त्याने एक चंदनाचा स्तूप बांधला होता. या स्तुपात भगवान बुद्ध ७० दिवस राहिले होते. सम्राट अशोकाने धम्मप्रसार सुरू केल्यानंतर त्याने आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना भिक्कू आणि भिक्कूणी बनवून पाठवले होते. त्यांनीही या स्तुपाला भेट देऊन बौद्ध धम्माच्या प्रसारास सुरुवात केली होती असे मानले जाते.
© Suresh Nimbalkar