SATERI-KUDAL
TYPE : MEDIEVAL DEVIMANDIR
DISTRICT : SINDHUDURG
सिंधुदुर्ग परिसरातील प्रमुख देवता म्हणजे सातेरी. या भागातील प्रत्येक गावात या देवतेचे मंदिर असतेच. वारूळ हेच तिचे प्रतीक. जिल्हय़ात सातेरी देवीची प्रसिद्ध अशी ७९ मंदिरे आहेत. परशुरामाची माता रेणुका ही सुद्धा एक ग्रामदेवता मानली गेली आहे. तिचा वारूळाशी संबंध अनेक कहाण्यांमधून सांगितला गेला आहे. रेणुका ही वारूळात जन्मली आणि वारूळातूनच अदृश्य झाली अशी कथा आहे. दक्षिण कोकणात वारुळाच्या पूजेची प्रथा त्यातूनच निर्माण झालेली असावी असे जाणकार सांगतात. सातेरी म्हणजे सप्त मातृकापैकी एक किंवा त्यांचा समुदाय असावा असे मत पंडित महादेवशास्री यांनी व्यक्त केले आहे. भारतात मातृपूजा आर्येत्तरांनी (द्रविड) चालू केली. तिची परंपरा अद्यापही खंडित झालेली नाही. सातेरीदेवीला कुठे माऊली असेही म्हणतात. वेंगुर्ले शहरापासुन अंदाजे २ की.मी. अंतरावर सातेरी देवी मंदीर कॅम्प परिसरातील परबवाड्यात आहे.
...
वेंगुर्ले ते कुडाळ या मार्गावरील सर्व गाड्या कॅम्पहून जातात. याशिवाय रिक्शाची रहदारी सतत चालु असते. वेंगुर्ले गाव सर्व सोयीयुक्त असुन गावचे ग्रामदेवता रामेश्वर व श्री देवी सातेरी आहे. वेंगुर्ला शहराची निर्मिती होण्यापुर्वीचे हे मंदीर असुन हि शिवाची आदिशक्ती सातेरी हे नाम धारण करून आणसुर येथे अवतरली. मंदिर शिवकालीन असुन मंदिराचे व्यवस्थापन परब घराण्याकडे आहे. गाभा-यात वारूळ असुन या वारूळात सातेरी देवी वास्तव्यास आहे असे भक्त मानतात. या वारुळालाच मूर्ती मानून सातेरी देवीची पूजा केली जाते. या भागात तांदळाचा प्रसाद लावून देवीशी संवाद साधला जातो. या वारूळाच्या शेजारील गाभाऱ्यात अनेक सुंदर कोरीव मूर्ती आहेत. अनेक लोक देवीकडे प्रसाद (कौल) घेऊन आपल्या समस्यांचे समाधान करतात. दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवीच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते. देवीच्या दर्शनाला पंचक्रोशीतील भाविक मोठया संखेने येतात. असे हे कोकणातील एक जागृत देवस्थान मानले जाते.
© Suresh Nimbalkar