RAVERI

TYPE : FORTRESS

DISTRICT : YAVATMAL

HEIGHT : 0

GRADE : EASY

यवतमाळ जिल्ह्याची दुर्गभटकंती करताना रावेरी,कायर,दुर्ग,कळंब यासारखे लहानमोठे गढीकोट पहायला मिळतात पण या गढीकोटांचा उल्लेख मात्र कोठेच दिसुन येत नाही. यातील कायर, दुर्ग, कळंब हे जरी किल्ले असले तरी रावेरी येथे असलेला भुईकोट मात्र गढी आहे. स्थानिकांना हि गढी बाळासाहेब देशमुख यांची गढी म्हणुन परीचीत आहे. रावेरी गढीला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम राळेगाव हे यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्याचे शहर गाठावे लागते. राळेगाव ते रावेरी हे अंतर ३ कि.मी. असुन तेथे जाण्यासाठी खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. रावेरी गावात प्रवेश केल्यावर रस्त्यावरूनच गढीची तटबंदी नजरेस पडते. गढीचे मुख्य गढी व परकोट असे दोन भाग पडलेले असुन मुख्य गढीच्या तटबंदीला लागुनच परकोटाची तटबंदी आहे. या परकोटातच बाळासाहेब देशमुख यांचा १००-१२५ वर्षापुर्वी बांधलेला वाडा आहे. गढीचा तळभाग दगडांनी बांधलेला असुन वरील भाग पांढऱ्या चिकणमातीने बांधलेला आहे. गढीच्या तटबंदीत पाच बुरुज असुन उत्तरेला तटबंदीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पोकळ बुरुजातून गढीत जाण्याचा वळणदार मार्ग आहे. ... या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस नष्ट होत चाललेल्या पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. गढीच्या आतील वास्तु पुर्णपणे जमीनदोस्त झाल्या असुन त्यावर झाडी वाढलेली आहे. किल्ल्याच्या दक्षिण-पश्चिम बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या असुन या बुरुजावरून संपुर्ण गढी तसेच दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गढीला पाणीपुरवठा करण्यासाठी दगडी बांधकामाची विहीर असुन हि विहीर बुजण्याच्या स्थितीत आहे. याशिवाय तटबंदीच्या आतुन फिरणारा एक भुयारी मार्ग आहे पण आतील माती भुसभुशीत झाल्याने त्यात उतरणे धोकादायक आहे. संपुर्ण गढी फिरण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. या शिवाय गावात सितामंदीर म्हणुन ओळखले जाणारे प्राचीन मंदिर पहायला मिळते. गढीचे मालक व देशमुखांचे वंशज बाळासाहेब देशमुख सध्या नागपुर येथे वास्तव्यास असतात. या देशमुखांना रावेर व परिसरातील वाटखेड व इतर दोन गावे गावे वतनात होती.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!