PREMGIRI

TYPE : HILL FORT

DISTRICT : NASHIK

HEIGHT : 2890 FEET

GRADE : MEDIUM

बागलाणची भटकंती करताना साल्हेर,सालोटा,मुल्हेर,हरगड, धोडप यासारखे प्रसिद्ध व प्रचंड विस्ताराचे किल्ले पहाताना पिंपळा,प्रेमगिरी यासारखे अपरीचीत लहान आकाराचे चौकीवजा किल्ले पहायला मिळतात. हे किल्ले फारसे परीचीत नसल्याने दुर्गप्रेमींची पाउले या किल्ल्यांकडे वळत नाही त्यामुळे किल्ल्यांवर जाणाऱ्या वाटा देखील फारशा मळलेल्या नाहीत. प्रेमगिरी नावाने ओळखला जाणारा असाच एक अपरीचीत दुर्ग आपल्याला नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात पहायला मिळतो. कळवण या तालुक्याच्यस ठिकाणाहुन ६ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला नाशिक शहरापासुन वणीमार्गे ७७ कि.मी.अंतरावर आहे. किल्ला आसपासच्या भागात फारसा परीचीत नसल्याने किल्ल्याकडे जाणारा मार्ग व्यवस्थित माहीती करून घ्यावा. कळवण गावातुन हिंगलवाडी गावाकडे जाताना २ कि.मी.अंतरावर डावीकडे एकलहरे गावात जाणारा फाटा आहे. या गावापुढे साधारण २ कि.मी.अंतरावर एक कच्चा रस्ता उजवीकडील डोंगराच्या दिशेने जातो. येथुन सरळ गेल्यास २ कि.मी.अंतरावर हिंगलवाडी गाव आहे व तेथुन परत मागे यावे लागते. ... उजवीकडील डोंगर म्हणजे प्रेमगिरी किल्ला असुन या कच्च्या रस्त्याने सरळ गेल्यावर आपण किल्ला व त्याशेजारचा डोंगर यांना जोडणाऱ्या सोंडेखाली पोहोचतो. (प्रेमगिरी किल्ल्यासाठी गुगलवर हा मार्ग व्यवस्थित अधोरेखित झालेला आहे) या सोंडेखाली वनखात्याने झाडे लावलेली आहेत. येथे एक शेतघर व गोठा असुन किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने येथुनच पाणी भरून घ्यावे. या घराच्या मागील बाजुने मळलेल्या वाटेने उभा चढ चढुन १५ मिनीटात आपण किल्ला व त्याच्या शेजारील डोंगराला जोडणाऱ्या सोंडेवर पोहोचतो. किल्ला फारसा परीचीत नसला तरी गडावर असलेल्या हनुमान मंदिरामुळे आसपासच्या गावातील लोकांचा किल्ल्यावर वावर असल्याने वाट चांगलीच मळलेली आहे. या सोंडेवर आल्यावर उजवीकडे वळुन किल्ला चढण्यास सुरवात करावी. वाटेवर काही ठिकाणी घसारा असल्याने हि वाट सांभाळून पार करावी. या वाटेने थोडे वर आल्यावर कातळात कोरलेल्या १०-१२ पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढुन गेल्यावर वाटेच्या शेवटच्या टप्प्यात २० फ़ूटाचा सोपा कातळटप्पा आहे. हा टप्पा चढुन गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. वाटेत तटबंदी,बुरुज, दरवाजा यासारखे किल्ल्याचे कोणतेही अवशेष दिसत नाहीत. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोर काटकोनात कोरलेली पाण्याची दोन टाकी दिसतात. स्थानिक लोक या टाक्यांना रामकुंड व सिताकुंड म्हणुन ओळखतात. यातील एका टाक्यात पाणी असले तरी स्थानिक त्यात अंघोळ करत असल्याने ते पिण्यायोग्य नाही. टाक्यासमोर काही अंतरावर एका झाडाखाली दगडी बांधणीचे मंदिर असुन यात हनुमानाची मुर्ती आहे. मंदिराबाहेर एका लाकडावर वाघ-चंद्र-सिंह यांच्या प्रतीमा कोरलेल्या आहेत. मंदिरासमोर काही अंतरावर एक उंचवटा असुन त्यावर एका वास्तुचे अवशेष आहेत. याशिवाय गडावर कोणतेही अवशेष नाहीत. किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची २८९० फुट असुन निमुळत्या आकाराचा गडमाथा दक्षिणोत्तर साधारण ३० एकरवर पसरलेला आहे. किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ला पाहुन परत पायथ्याशी येण्यासाठी तीन तास पुरेसे होतात. किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने मुक्काम करणे सोयीचे नाही. सेलबारी - डोलबारी डोंगररांगेवर असलेल्या साल्हेर, सालोटा, मुल्हेर या किल्ल्यांकडे जाणार्याा मार्गावर टेहळणी करण्यासाठी पिंपळा, प्रेमगिरी या सारख्या किल्ल्यांची निर्मीती करण्यात आली असा
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!