PARGAON SHINGVE
TYPE : NAGARKOT
DISTRICT : PUNE
HEIGHT : 0
मंचरहुन भीमाशंकर साखर कारखान्याकडे जाताना वाटेत १५ कि.मी. अंतरावर घोडनदीच्या काठी पारगाव शिंगवे नावाचे गाव आहे. या गावाचा येथे उल्लेख करण्याचे कारण म्हणजे या गावाची वेस. दोन बुरुजात असलेली हि वेस कधीकाळी पारगाव शिंगवे गाव नगरकोटाच्या तटबंदीत वसल्याचे दर्शविते. काळाच्या ओघात या गावाभोवती असलेली तटबंदी नष्ट झाली असली तरी या तटबंदीतील दरवाजा शेजारी असणारे दोन बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. या दोन बुरुजात असणारा दरवाजा गावचा रस्ता बनवताना पाडला गेला. दुर्लक्षामुळे या दोन्ही बुरुजाची देखील आता पडझड झाली आहे. या दोन्ही बुरुजांना लागून एक विरगळ व एक धेनुगळ ठेवलेली आहे. पारगाव शिंगवे नगरकोटाचा हा अवशेष पहाण्यासाठी ५ मिनिटे पुरेशी होतात. गावाचा इतिहास तेथील स्थानिकांना देखील माहित नाही. पारगाव शिंगवे गावापासुन २.५ कि.मी. अंतरावर शिंगवे पारगाव नावाचे दुसरे गाव असुन या दोन्ही नावातील साम्य लक्षात ठेऊनच या नगरकोटास भेट द्यावी.
...
© Suresh Nimbalkar