PACHORA

TYPE : FORTRESS

DISTRICT : JALGAON

HEIGHT : 0

खानदेशातील जळगाव हा प्रांत बहुतांशी सपाटीवर असल्याने या भागातील गिरिदुर्गांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. या भागातील प्रशासन व्यवस्था येथील स्थानिक वतनदार घराण्याकडून सांभाळली जात असल्याने मध्यवर्ती राज्यकर्ते कोणीही असो, त्यांच्याशी जुळवुन घेण्याचे काम हे स्थानिक वतनदार करत असत. हे वतनदार त्यांचा बहुतांशी कारभार त्याच्या गढीतुन सांभाळत असत त्यामुळे या भागात गढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसुन येते. हे वतनदार या गढीत मुक्कामाला असल्याने तेथील सुरक्षाव्यवस्था चोख असे. हि गढी एखाद्या किल्ल्याप्रमाणे तटबुरुजानी बंदीस्त केली असे. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढी आता उध्वस्त होत आहेत तर काही पुर्णपणे नष्ट झाल्या असल्या तरी अवशेष रूपाने आपले स्थान टिकवुन आहेत. आपले स्थान दर्शविणारा असाच एक गढी अवशेष आपल्याला पाचोरा या तालुक्याच्या ठिकाणी पहायला मिळतो. १९ व्या शतकाच्या सुरवातीस पाचोरा येथील मामलेदार कचेरी तेथील गढी होती हे वाक्य वाचनात आल्याने आम्ही या गढीचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. ... आज हि गढी पुर्णपणे नष्ट झाली असुन तिचा एकमेव बुरुज अवशेष रुपात शिल्लक आहे. पाचोरा येथील हा बुरुज पहायचा असल्यास जुना पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीत यावे. या गल्लीत भवानी मातेचे मंदिर असुन या मंदिराजवळच हा बुरुज पहायला मिळतो. हा बुरुज साधारण ३० फुट उंच असुन त्याचे तळातील १५ फुटापर्यंत बांधकाम दगडात केले असुन त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. या एका बुरुजावरूनच या गढीच्या आकारमानाची व मजबुतीची कल्पना येते. या बुरुजाच्या आसपास घरे झालेली असुन एका चिंचोळ्या बोळीतून बुरुजावर जाण्याचा पायरीमार्ग आहे. या बुरुजावर एक थडगे असुन केवळ या थडग्यामुळेच हा बुरुज शिल्लक राहीला असावा. गढीच्या दोन बाजुस हिवरा नदीचे पात्र असुन या नदीचे नैसर्गिक संरक्षण या गढीला लाभले आहे. पुर्वी हे पात्र गढीच्या तीन बाजुस असण्याची शक्यता आहे. बुरुजावरून संपुर्ण जुने पाचोरा शहर नजरेस पडते. इंग्रज काळात या गढीची मालकी येथे असलेल्या देशमुख या मुस्लीम कुटुंबाकडे असल्याचे कळते. त्यांचा येथील चौसोपी वाडा आजही अस्तित्वात असुन आम्ही त्यांची भेट घेतली पण त्यांच्याकडून फारशी माहिती उपलब्ध झाली नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!