NEMGIRI

TYPE : HILL FORT

DISTRICT : PARBHANI

HEIGHT : 1750 FEET

GRADE : EASY

मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात एखाद दुसरा भुईकोट व अपवादात्मक गिरीदुर्ग वगळता फार कमी प्रमाणात किल्ले पहायला मिळतात. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेला एकमेव गिरीदुर्ग म्हणजे नेमगिरी किल्ला. एका लहानशा टेकडावर हा लहानसा दुर्ग आपल्याला पहायला मिळतो. नेमगीरी नावाने प्रसिद्ध असलेले हे ठिकाण किल्ला कमी आणि जैन धर्मीयांचे देवस्थान म्हणुनच जास्त ओळखले जाते. नेमगिरी किल्ला जिंतूर या तालुक्याच्या शहरापासून साधारण ३ कि.मी.अंतरावर आहे. किल्ल्याच्या माथ्यावर जैन धर्मीयांचे देवस्थान असल्याने गाडी थेट किल्ल्याच्या माथ्यावर जाते. काळाच्या ओघात किल्ल्याच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या असुन एक बुरुज व थोडीफार तटबंदी शिल्लक आहे. किल्ल्याच्या आतील भागात जमिनीखाली सात गुहामंदीरे असुन या सर्व गुहा एकमेकाशी भुयारी मार्गांनी जोडलेल्या आहेत. या सर्व गुहेत जैन धर्मातील वेगवेगळ्या तीर्थंकरांच्या मुर्ती आहेत. यातील पाचव्या गुहेत असलेली अंतरीक्ष पार्श्वनाथ भगवान यांची मुर्ती विशेष प्रसिद्ध आहे. ... सव्वासहा फुट उंच व साधारण नऊ टन वजनाची पद्मासनातील हि मुर्ती सुपारी इतक्या लहान दगडावर तोललेली असुन मुर्तीखालील इतर भाग पुर्णपणे पोकळ आहे. विनंती केल्यास येथील पुजारी मुर्तीखाली कागद फिरवुन आपल्याला दाखवून देतात. सर्व गुहा फिरून ज्या दरवाजाने आपण गुहेत प्रवेश करतो त्याच दरवाजाने बाहेर पडतो. किल्ल्याच्या इतर भागात नवीन बांधकाम झालेले असल्याने कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. किल्ल्याच्या माथ्यावरून समोरच असलेला चंद्रगिरी नावाचा दुसरा डोंगर नजरेस पडतो. आजचे जिंतूर हे प्राचीन काळी जैनपुर या नावाने प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट घराण्यातील सम्राट अमोघवर्ष याच्या काळात हि लेणी विकसित झाली. या नंतर झालेल्या परकीय आक्रमणात हि लेणी विस्मरणात गेली व जैनपुरचा अपभ्रंश जिंतूर झाला. पुर्वीपासूनच हे देवस्थान म्हणुन प्रसिद्ध असल्याने किल्ल्याचा इतर कोणताही इतिहास उपलब्ध नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!