MANCHAR

TYPE : NAGARKOT

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

पुणे-नाशिक महामार्गाने पुण्याहून नाशिककडे जाताना चाकण, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर यासारखी मध्ययुगीन काळातील अनेक महत्वाची शहरे पहायला मिळतात. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पुण्याहुन ७० कि.मी अंतरावर असलेले मंचर शहर त्यापैकी एक. बारा जोतीर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर येथे जाणारा रस्ता या शहरातुन जात असल्याने या शहराची खास ओळख निर्माण झाली आहे. असे असले तरी प्राचीन काळापासूनच मंचर (मणिपुर) हे जुन्नर-पैठण या व्यापारी मार्गावरील एक महत्वाचे नगर होते. याची साक्ष आपल्याला तपनेश्वर मंदिर परीसरात असलेली प्राचीन बारव व त्यावरील इ.स.१३४४ वर्ष कोरलेला शिलालेख देतो. इतके महत्वाचे नगर म्हणजे त्याला कोट असणे साहजिकच आहे पण आज मंचर शहरात कोठेही कोटाचे अवशेष दिसुन येत नाही. शिवाजी महाराज चौक येथे या कोटाचा दरवाजा असल्याचे सांगण्यात येते पण आता तेथे नव्याने बांधलेले प्रवेशद्वार असुन जुन्या दरवाजाचा मागमुस देखील लागत नाही. या शिवाय मंचर शहरात होळकरांची गढी असल्याचे देखील काही स्थानिक वयोवृद्ध सांगतात पण त्याचे निश्चित स्थान मात्र कोणाला सांगता आले नाही. ... थोडक्यात वाढत्या शहरीकरणामुळे मंचर शहराचे इतिहासाशी नाते सांगणाऱ्या खुणा काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. तपनेश्वर मंदिर परिसरातील प्राचीन बारव वगळता शहराचे प्राचीन इतिहासाशी नाते दर्शविणाऱ्या इतर कोणत्याही वास्तु आता दिसुन येत नाही. बारवेपासुन जवळच असलेले राम मंदीर होळकरांनी बांधलेले असुन त्याच्या पूजेअर्चेसाठी येथील (शाळीग्राम) कुलकर्णी कुटुंबाची नेमणुक केली होती. इ.स.१९६० पर्यंत या मंदीरासाठी इंदोर संस्थानाकडून निधी दिला जात होता. मराठेशाहीच्या अस्तानंतर इ.स.१८२७ पर्यंत मंचर शहराचा ताबा होळकरांकडे असल्याचे कॅप्टन क्लुन्स याच्या कागदपत्रात दिसुन येते. पुढे १८६८-६९ मध्ये मंचर व परिसराचा ताबा ब्रिटिशांकडे असल्याचे दिसुन येते. (टीप- मंचर शहरात कोटाचे कोणतेच अवशेष नसल्याने कोट पहाण्यास मंचर येथे जाण्याची गरज नाही.)
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!