KUROLI

TYPE : FORTRESS

DISTRICT : SATARA

HEIGHT : 0

GRADE : EASY

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दुर्गभ्रमंती करताना आपल्याला महिमानगड,वर्धनगड, भुषणगड, यासारखे अनेक गिरीदुर्ग पहायला मिळतात. या गिरीदुर्गांचे आपल्या मनावर इतके गारुड आहे कि या भागात असलेल्या गढी पहायचे राहुनच जाते. अशीच एक अपरीचीत गढी आपल्याला कुरोली गावात पहायला मिळते. गावात सिद्धेश्वराचे प्रसिध्द मंदिर असल्याने हे गाव कुरोली सिद्धेश्वर या नावाने ओळखले जाते. सिद्धेश्वर कुरोली गाव वडुज सातारा मार्गावर औंध शहरापासुन १० कि.मी. अंतरावर तर वडूज शहरापासुन ७ कि.मी.अंतरावर आहे. वडुज येथुन गेल्यास कुरोली गावात प्रवेश करताना नदीवरील पुल पार केल्यावर उजव्या बाजुस काही अंतरावर या गढीची तटबंदी व त्यातील दोन टोकावर असलेले दोन बुरुज नजरेस पडतात. गावात गढी या शब्दाचा स्थानिकांना फारसा परिचय नसल्याने ते या वास्तुस राजवाडा म्हणुन ओळखतात. मुख्य रस्ता सोडून आत आल्यावर गढीच्या दोन टोकास असलेले दोन बुरुज व तटबंदीच्या मध्यभागी असलेला लहान दरवाजा नजरेस पडतो. गढीचा हा मागील मागील भाग असुन गढीचे मुख्य प्रवेशद्वार याच्या विरुद्ध दिशेस आहे.चौकोनी आकाराची हि गढी साधारण एक एकरवर पसरलेली असुन गढीच्या पश्चिमेला मुख्य दरवाजा तर पूर्वेला दुसरा लहान दरवाजा आहे. ... तटबंदीची उंची साधारण २५ फुट असुन तटबंदीच्या चार टोकावर चार गोलाकार बुरुज आहेत. तटबंदी व बुरुजाचा खालील भाग दगडांनी बांधलेला असुन वरील भागाच्या बांधकामासाठी पांढरी चिकणमाती वापरलेली आहे. गढीचा मुख्य दरवाजा घडीव दगडात बांधलेला असुन त्यातील लाकडी दारे आजही शिल्लक आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस घडीव दगडात बांधलेले चौथरे आहेत. दरवाजाने आत आल्यावर समोर गढीच्या मध्यभागी चौसोपी वाडा असुन तो कुलुपबंद असल्याने आतुन पहाता येत नाही. गढीला पाणीपुरवठा करण्यासाठी या वाड्याच्या डाव्या बाजुस साधारण ६० फुट खोल विहीर आहे. गढीच्या उत्तर भागात असलेला खंदक पहाता कधीकाळी या संपुर्ण गढीभोवती खंदक असावा. गढीचा भाग उंचावर असल्याने येथुन बहुतांशी कुरोली गाव नजरेस पडते. संपुर्ण गढी फिरण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. हि गढी औंधचे पंतप्रतिनिधी यांच्या मावशीची असल्याचे स्थानिक सांगतात. सध्या गढीचा ताबा सिद्धेश्वर मंदिर संस्थानाकडे आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!