KHULTABAD

TYPE : TOMB

DISTRICT : AURANGABAD

औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबादहुन १२ कि.मी.आणि वेरूळपासुन ४ कि.मी.अंतरावर खुलताबाद हे महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. भद्रा मारुती या धार्मिiक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत. हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. प्राचीन काळी भद्रावती असे नाव असलेल्या या गावाला रत्नादपूर नावाने देखील ओळखले जाते. खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान ह्यासाठी देखील विशेष परिचित आहे. भद्रा मारूती ह्या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. ... खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातून पायी चालत येतात. फार पूर्वी ह्या गावाचे नाव रौझा असेही होते,त्याचा अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो.तसेच ह्या गावास संतांची भूमी किंवा शाश्वत निवासस्थान असेही संबोधले जायचे. ह्याचे कारण १४ व्या शतकात अनेक सूफी संत ह्या ठिकाणी वास्तव्यास होते व तदनंतर त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे खुलदाबाद येथेच दफन करण्यात आले. खुलताबादमध्ये दफन करण्या आलेले सूफी संतामध्ये मोगल सम्राट औरंगजेबचे गुरु ख्वाजा जैनोद्दीन सिराजी रह्बावीस ख्वाजा यांची कबर मुख्य आहे. मोगल सम्राट औरंगजेब याचा मृत्यु अहमदनगरमध्ये भिंगार येथे इ.स.१७०७ मध्ये झाला.त्याचे इच्छानुसार त्याचे गुरु ख्वाजा जैनोद्दीन सिराजी रह्बावीस ख्वाजा यांच्या दर्ग्यात त्याची कबर बांधण्यात आली. त्याच्या इच्छानुसार कबर अतिशय साधी बांधण्यात अली असुन त्यावर एक सब्जाचे रोप लावण्यात आले आहे. ब्रिटिश कालखंडात व्हाईसरॉय कर्झन याच्या सूचनेनुसार हैदराबादच्या निजामाकडून कबरीभोवती संगमरवरी जाळी बसविण्यात आली. याशिवाय येथे निझाम-उल-मुल्क असफ जाह व मलिक अंबर यांच्यादेखील कबरी आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!