KHEDGAON NANDICHE

TYPE : FORTRESS ?

DISTRICT : JALGAON

HEIGHT : 0

आंतरजालच्या काळात आज आपल्याला हवी ती माहीती क्षणभरात संगणकावर उपलब्ध होते. आपल्याजवळ असलेली माहीती आपण इतरांसाठी सहजपणे उपलब्ध करून देतो. पण हि माहीती सत्य कि असत्य याविषयी कोणी खात्री करून घेत नाही. अनेकदा हि माहीती फायद्याची ठरत असली तरी काही वेळा ती चुकीची देखील असते. याच अनुभव आम्हाला जळगाव जिल्ह्यातील गढी कोटांची भटकंती करताना आला. आंतरजालावर खेडगाव नंदीचे येथे कोट असल्याची माहिती वाचनात आल्याने मी आमच्या भटकंतीच्या यादीत या गावाचे नाव सामील केले व या गावाला भेट दिली. पाचोरा तालुक्यात असलेले खेडगाव नंदीचे हे गाव पाचोरा जळगाव महामार्गावर वसलेले पाचोरा येथुन ८ कि.मी.अंतरावर तर जळगाव येथुन ४० कि.मी.अंतरावर आहे. खेडगाव या गावाचे नाव खेडगाव नंदीचे का पडले याबद्दल स्थानिक लोक एक कथा सांगतात. गावातील एका व्यक्तीकडे एक बैल होता त्यास कामास जुंपले असता तो अश्रु ढाळत असे त्यामुळे त्याला नंदी म्हणून सोडण्यात आले. तो नंदी मरण पावल्यावर त्याची गावात समाधी बांधण्यात आली व त्यानंतर हे गाव खेडगाव नंदीचे म्हणुन ओळखले जाऊ लागले. ... पुर्वीच्या काळी तालुक्याची आर्थिक राजधानी अशी खेडगाव नंदीचे गावाची ओळख होती. गावात प्रवेश करताना गावातील ३-४ मजली भव्य वाडे पाहिल्यावर याची कल्पना येते व गावाच्या पुर्वीच्या वैभवाची कल्पना येते. आज ते सारे वैभव लयाला गेले असुन या वाड्याची पडझड झाल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. हे प्रचंड मोठे वाडे व त्याच्या लाकडावरील कोरीवकाम हे आवर्जुन पहाण्यासारखे आहे. पण राहण्यासाठी १००-१२५ वर्षापुर्वी बांधलेले हे भक्कम वाडे म्हणजे कोट नाही. कोणीतरी आंतरजालावर या भव्य वाड्यांचा कोट म्हणुन उल्लेख केला आहे तो पुर्णपणे चुकीचा आहे. पुर्वी पासुन खाजगी मालमत्ता असलेल्या या वाड्याचा कधीही प्रशासकीय कामासाठी वापर झाला नसुन यात कोणत्याही प्रकारची संरक्षक रचना नाही. परिणामी येथे कोणतीही गढी नाही पण येथे असलेले तीन भव्य वाडे मात्र आवर्जुन पहावे असेच आहे. या गावाला वाडे पहाण्यासाठी भेट देता येईल पण कोणतीही गढी अथवा कोट येथे नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!