JAWALGAON

TYPE : FORTRESS

DISTRICT : BEED

HEIGHT : 0

GRADE : EASY

मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला फार कमी प्रमाणात दुर्ग पहायला मिळतात. मराठवाडयातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला येथे किल्ल्यायेवजी गढी जास्त प्रमाणात पहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील किल्ल्यांची भटकंती करताना अंबेजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे अशीच एक उध्वस्त गढी पहायला मिळते. जवळगाव- अंबेजोगाई हे अंतर २० कि.मी.असुन अंबेजोगाई-अहमदपूर मार्गावरील पूस फाटा येथुन जवळगाव ८ कि.मी.अंतरावर आहे. अंबेजोगाईहून जवळगावाकडे जाण्यासाठी थेट बस नसल्याने आधी बसने पूस फाटा येथे उतरावे लागते व पुढे खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. ... जवळगावात प्रवेश करताना दुरूनच या गढीची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. गावात हि गढी शिंदेची गढी म्हणुन ओळखली जाते. शिंदेंचे वंशज या गढी जवळच वास्तव्यास आहेत. गढीच्या चार टोकास चार बुरुज असुन यातील एक बुरुज सरकारी दवाखान्याच्या जागेसाठी अलीकडील काळात पाडला गेला आहे. गढीचा खालील भाग घडीव दगडात बांधलेला असुन वरील भागासाठी पांढरी चिकट माती वापरलेली आहे. गढीचे बहुताशी दगड हे गावकऱ्यांनी त्यांच्या घराच्या बांधकामासाठी नेल्याने आता गढीच्या तटबंदीत फारच कमी प्रमाणात दगड शिल्लक आहेत. शिल्लक आहे तो आतील २५ फुट उंचीचा भराव व मातीचे अखंड बुरुज. गढीचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन या भागातील दगडी तटबंदी आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन आत घडीव दगडात बांधलेल्या पायरीमार्गाने आपण गढीच्या माथ्यावर पोहोचतो. गढीचा माथा साधारण १५ गुंठे असुन सर्वत्र घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. येथे राहणारे शिंदे यांचे वंशज अलीकडील काळातच गावात राहायला गेले आहेत. गढीला पाणी पुरवठा करण्यासाठी गढीच्या पश्चिम दिशेला सुंदर पुष्करणी आहे. या पुष्करणीतुन दगडी पन्हाळीने गढीला पाणीपुरवठा केला जात असे. हा दगडी पाणीमार्ग आजही आपल्याला येथे पहायला मिळतो. गढीपासुन काही अंतरावर घडीव दगडी बांधणीतील एक मोठा दरवाजा पहायला मिळतो. गढी व आसपासचे अवशेष पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. शिंदे यांच्या वंशजांना हि गढी व त्यांच्या पुर्वजाविषयी फारशी माहीती दिसुन येत नाही पण ते हि गढी पाचशे वर्ष जुनी असल्याचे सांगतात. गढी शेजारी असलेल्या पुष्करणीचे बांधकाम पहाता त्याची प्रचीती येते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!