BAMBRUD-RANICHE

TYPE : FORTRESS

DISTRICT : JALGAON

HEIGHT : 0

महाराष्ट्रात दिसणाऱ्या जवळपास सर्वच गढ्या या मध्ययुगीन काळात अथवा मध्ययुगीन काळाच्या उत्तरार्धात बांधल्या गेल्या आहे. जळगाव जिल्ह्यात आढळणाऱ्या गढ्या देखील याला अपवाद नाहीत पण अपवाद आहे तो फक्त एकाच गढीचा. हि गढी म्हणजे बांबरूड राणीचे या गावात असलेली गढी. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेले हे गाव पाचोरा या तालुक्याच्या ठिकाणाहुन २२ कि.मी.अंतरावर तर जळगाव जिल्ह्यापासून ३० कि.मी.अंतरावर आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात असलेली हि गढी एका चौथऱ्यावर बांधलेली असुन आज केवळ अवशेषरुपात शिल्लक आहे. गढीचा पाया मोठमोठ्या घडीव दगडात बांधलेला असुन आयताकृती आकाराची हि गढी साधारण अर्धा एकरवर पसरलेली आहे. गढीची तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली असुन केवळ पुर्व बाजूची तटबंदी काही प्रमाणात शिल्लक आहे. या तटबंदीत गढीबाहेर जाण्यासाठी लाकडी दरवाजा आहे पण सध्या तो बंद करण्यात आला आहे. तटबंदीचे संपुर्ण बांधकाम विटांनी केलेले असुन या भिंतीत अनेक कमानी आहेत. शिल्लक असलेली हि तटबंदी पहाता हि गढी दुमजली किंवा त्यापेक्षा जास्त उंच असावी. ... गढीची एकमेव भिंत शिल्लक असल्याने ती पहाण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. गढीच्या एकंदरीत बांधकामावरून ते अतिशय जुने असल्याचे दिसुन येते पण हि गढी नेमकी कोणत्या काळात बांधली गेली हे ज्ञात नाही. बांबरूड हे गाव राणी लीलावती हिला जहागीर असल्याने ते बांबरूड राणीचे म्हणुन ओळखले जाते. हि राणी लीलावती कोण हे आज ठामपणे सांगता येत नसले तरी काही अभ्यासकांच्या मते हि राणी लीलावती म्हणजे यादवांच्या पदरी असलेले प्रसिद्ध ज्योतिर्विद भास्कराचार्य यांची मुलगी लीलावती असावी. हे गाव यादवांनी अथवा त्यांचे मांडलिक असलेले निकुंभ यांनी भास्कराचार्य यांची मुलगी लीलावती हिला जहागीर म्हणुन दिले असावे पण याला कोणताही सबळ पुरावा नाही. भास्कराचार्य यांची हि कर्मभुमी व देवगिरी शहराशी असलेली या शहराची जवळीक पहाता याची जास्त शक्यता वाटते. उत्तर काहीही असले तरी बांबरूड हे गाव राणी लीलावतीमुळेच बांबरूड राणीचे म्हणुन ओळखले जाते हे निर्विवाद सत्य आहे व स्थानिक कथा त्यास दुजोरा देतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!