ASARDOHA

TYPE : FORTRESS

DISTRICT : BEED

HEIGHT : 0

GRADE : EASY

मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला फार कमी प्रमाणात दुर्ग पहायला मिळतात. मराठवाडा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला येथे किल्ल्यायेवजी गढी जास्त प्रमाणात पहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील किल्ल्यांची भटकंती करताना धारूर तालुक्यातील आसरडोह येथे अशाच एका नष्ट झालेल्या गढीचा बुरुज पहायला मिळतो. धारूर- आसरडोह हे अंतर १८ कि.मी.असुन आडस येथुन हे अंतर ६ कि.मी. आहे. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. गावात प्रवेश करताना महादेव मंदिराजवळील दरवाजाचे अवशेष पहाता कधीकाळी या संपुर्ण गावाला तटबंदी असल्याचे लक्षात येते. रस्ता बांधताना या दरवाजाची वरील कमान पुर्णपणे नष्ट झाली असुन दरवाजात असलेली पहारेकऱ्याची देवडी मात्र शिल्लक आहे. ... गावात असलेली शितोळे देशमुखांची गढी आज पुर्णपणे नष्ट झालेली असुन गढीच्या जागी त्यांचा वाडा आहे. हा वाडा बांधण्यासाठी गढीच्या दगडांचा वापर केलेला असावा. या गढीचे अस्तिव सांगणारा एक बुरुज मात्र आजही या वाड्याच्या टोकाशी ठामपणे उभा आहे. पुर्णपणे पांढऱ्या चिकणमातीत असलेल्या या बुरुजाची उंची साधारण ३० फुट असुन गढी नष्ट झाल्याने या बुरुजावर जाता येत नाही. गढीच्या आत असलेली पाण्याची विहीर आता वाडयाच्या आतील भागात आहे. बुरुज पहाण्यासाठी ५ मिनिटे पुरेशी होतात. याशिवाय आसरडोह गावाबाहेर एका शेतात एक एकांडा बुरुज पहायला मिळतो. गढीतील देशमुख या गढीविषयी व त्यांच्या पुर्वजांविषयी पुर्णपणे अज्ञानी आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!