ANJURKAR WADA

TYPE : MANSION

DISTRICT : THANE

HEIGHT : 0

GRADE : EASY

चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत ठाणे वसई भागातील पराक्रम गाजवणारी तीन महत्वाची घराणी म्हणजे ठाण्याचे रामजी बिवलकर,अर्नाळ्याजवळील आगाशी येथील शंकराजी फडके व भिवंडीजवळील अणजूर येथील गंगाजी नाईक अणजूरकर. यातील शंकराजी फडके यांचा वाडा अलीकडील काळात नष्ट झाला असुन रामजी बिवलकर यांचा वाडा रस्ता रुंदीकरणात पाडण्यात आला. मात्र गंगाजी नाईक अणजूरकर यांच्या वंशजांनी त्यांच्या पुर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा अणजूरकर वाडा केवळ सांभाळला नसुन त्याची व्यवस्थित निगा राखली आहे. अणजूर येथील गणपतीसाठी प्रसिद्ध असलेले सिद्धिविनायक मंदीर म्हणजेच गंगाजी नाईक यांचा अणजूरकर वाडा. सिद्धिविनायकाचे हे मंदीर वाडयाच्या आत असुन त्यालाच आज गंगाजी नाईक अणजूरकर यांचे स्मारक म्हणता येईल. अणजूर गावात व आसपासच्या परिसरात सिद्धिविनायक म्हणुन प्रसिध्द असलेले हे मंदीर मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली येथुन ३ कि.मी.अंतरावर आहे. ... ठाणे –भिवंडी येथुन माणकोली महामार्गावर येण्यासाठी बस आहेत पण पुढे अणजूर येथे जाण्यासाठी मात्र खाजगी रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. अणजूर गावात रिक्षा जेथे थांबतात तेथे समोरच उंच दगडी जोत्यावर उभारलेला अणजूरकर यांचा दुमजली पाचखणी वाडा आहे. वाड्याच्या दर्शनी भागात असलेल्या ओसरीच्या खांबांवर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मुख्य दरवाजाने वाड्याच्या आत प्रवेश केल्यावर लाकडी बांधकामातील (देव्हारा) सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. या मुर्तीची स्थापना गंगाजी नाईक यांनी इ.स. १७१८ मध्ये केलेली असुन हि उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती त्यांना चिंचवडचे मोरया गोसावी यांचे नातु नारायण महाराज यांचे जेष्ठ पुत्र चिंतामणी महाराज यांनी अनुग्रह म्हणुन दिलेली आहे. वाड्याच्या उर्वरीत भागात अणजुरकर यांचे वंशज वास्तव्यास असल्याने इथपर्यंत मर्यादित प्रवेश दिला जातो. गंगाजी नाईक अणजूरकर यांच्या घराण्याचा संपुर्ण इतिहास www.siddhivinayakanjur.org या संकेतस्थळावर उपलब्ध असुन अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर भेट दयावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!