AJMALGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : NAVSARI

HEIGHT : 1200 FEET

GRDE : EASY

महाराष्ट्राच्या गुजरात सीमा प्रांतात असलेल्या अनेक किल्ल्यांवर मराठयांच्या पाउलखुणा उमटलेल्या आहेत. नवसारी जिल्ह्यातील वासंदा तालुक्यातील घोडमळ गावाजवळ असलेला अजमलगड हा असाच एक किल्ला. किल्ल्यावर जाण्यासाठी बलसाड हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक असुन हे अंतर ५२ कि.मी.आहे. किल्ल्यावर असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाची स्थापना शिवाजी महाराजांनी केल्याचे मानले जाते. गुजरात पर्यटन मंत्रालयाने फलकावर किल्ल्याची माहिती लिहीताना त्यात हि माहिती नोंदवली असुन सुरत लुटुन जाताना मराठयांनी या किल्ल्यावर छावणी केल्याचे म्हटले आहे. अजमलगड किल्ला वासंदा शहरापासून १२ कि.मी तर धरमपूरपासून २५ कि.मी अंतरावर आहे. वासंदा-धरमपूर महामार्गावरील घोडमाळ येथे जाणाऱ्या फाट्यावरून हा किल्ला साधारण ५ कि.मी.आत आहे. महामार्गापासून आत जाण्यासाठी वाहनांची फारशी सोय नसल्याने जाण्या-येण्यासाठी खासगी रिक्षा ठरवुनच गडावर जावे. गुजरात पर्यटन व वनखात्याने गडाचा विकास केला असल्याने गाडी थेट गडावर जाते. यासाठी ३० रुपये प्रवेशशुल्क आकारले जाते. ... गाडी गडावर जेथुन प्रवेश करते तेथे ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. या ठिकाणी रस्त्याच्या उजवीकडे लहानशी घुमटी असुन डावीकडे पाण्याचे खडकात कोरलेले लहान टाके आहे. या टाक्यापुढे काही अंतरावर एक खोदीव तलाव आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगावर वसलेला हा गड समुद्रसपाटीपासून १२०० फुट उंचावर असुन साधारण ८ एकरवर पसरलेला आहे. पुर्णपणे सपाट असलेल्या या पठारावर रामाचे व महादेवाचे नव्याने बांधलेले मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना शिवाजी महाराजांनी केल्याचे सांगीतले जाते. याशिवाय नव्याने बांधलेला पारशी स्मृतीस्तंभ दिसुन येतो. वन विभागाने काठावर काही ठिकाणी पर्यटकांसाठी छत्री निवारे उभारले बांधण्यात आले आहेत. गडफेरी करताना गडाच्या पुर्व भागात घडीव दगडांच्या तटबंदीचा पाया तसेच एका बुरुजाचे अवशेष पहायला मिळतात. पठाराच्या काठाने फेरी मारताना परिसरात असलेले घनदाट जंगल दिसुन येते. संपुर्ण गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. इ.स. ७ व्या शतकात वासंदाचा राजा श्रीमंत कीर्तिदेव याच्या काळात संजान बंदरावर उतरलेले पारशी मुस्लिम, पोर्तुगीज तसेच फ्रेंच यांच्या आक्रमणापासून त्यांच्या पवित्र अग्नी "इरानशाह अताश"चे संरक्षण करण्यासाठी १६ व्या शतकात या टेकडीवर स्थलांतरित झाले आणि सुमारे १४ वर्षे येथे राहिले. त्याच्या स्मरणार्थ येथे पारशी स्तंभ उभारण्यात आला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!